मुंबई: इतिहासातील सर्वात मोठी घटना म्हणून पानिपतच्या युद्धाकडे पहिले जाते. मराठा आणि मोगलांमध्ये पानिपतचे युद्ध झाले होते. या युद्धाची कथा आता बॉलीवूडच्या पडद्यावर येत आहे. बॉलीवूडमधील आघाडीचे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी दिग्दर्शित केलेल्या पानिपत या चित्रपटाचे ट्रेलर आज रिलीज झाले. येत्या ६ डिसेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ट्रेलर अतिशय रंजक आणि अंगांवर काटे आणणारा आहे.
ट्रेलरमधून इतिहासातील पानिपतचे युद्ध किती मोठे असेल याची प्रचीती येते. या चित्रपटात अर्जुन कपूर, संजय दत्त, क्रीती सेनन मुख्य भूमिकेत आहे. अर्जुन कपूर मराठा योद्धा सदाशिवराव यांच्या तर संजय दत्त अहमदशहा अब्दाली यांच्या भूमिकेत आहे.