पणजी: देशाचे माजी संरक्षण मंत्री, तथा गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर घेण्यात आलेल्या मतदानात भाजपाला धक्का बसला आहे. ती जागा कॉंग्रेसच्या खात्यात गेली आहे. यारिक्त झालेल्या जागेवर भाजपाने सिद्धार्थ कुंकळीकर यांना उमेदवारी दिली होती, तर कॉंग्रेस ने अटानेसियो मॉनसरेट यांना उमेदवारी दिली होती.
देशात भाजपचे वारे वाहत असताना, गोव्यात झालेल्या या पराभवामुळे आनंदावर विरजण पडले आहे. १९९४ साला पासून ही जागा भाजपाच्या ताब्यात होती. या जागेवर मनोहर पर्रीकर हे निवडून येत होते. मनोहर पर्रीकर यांचे निधन झाल्यामुळे हि जागा रिक्त झाली होती.
अटानेसियो मॉनसरेट यांचा १ हजार ७७४ मतांनी विजय झाला आहे. गोवा विधानसभेत एकूण ४० जागा आहेत. त्या पैकी भाजपाकडे १२ जागा आहेत. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष, व गोवा फोरवर्ड पार्टीचे विजय सरदेसाई आणि ३ अपक्ष यांच्या सहकार्याने तिथे भाजपाने सत्ता स्थापन केली आहे. कॉंग्रेस कडे १५ जागा आहेत.