राष्ट्रीय शिक्षा रत्न पुरस्काराने पंकज शिंदे सन्मानित

चोपडा (प्रतिनिधी) : चोपडा एज्युकेशन सोसायटी संचलित प्रताप विद्या मंदिर चोपडाचे उपक्रमशील उपशिक्षक पंकज प्र शिंदे यांनी शिक्षण,गडकोट संवर्धन, सांस्कृतिक वारसा संवर्धन, सामाजिक व पर्यावरण रक्षण आदी क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन ‘इंडो ग्लोबल व्हिजन डेव्हलपमेंट गुरुकुल फाउंडेशन, धुळे तर्फे नुकतेच शिंदे यांना राष्ट्रीय शिक्षा रत्न पुरस्कार २०२३ देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

धुळे येथील शिवाजी विद्या प्रसारक संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. संजय पाटील यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी दिलीप रामू पाटील (जळगाव), डॉ. सूर्यकांत थोरात (स्वामी रामानंदतीर्थ विद्यापीठ, नांदेड), प्रा. डॉ. सचिन नांद्रे (संचालक, रासेयो, कबचौउमवि जळगाव), डॉ संभाजी पाटील आणि मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पंकज शिंदे यांचा सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

पंकज शिंदे यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल चोपडा एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्ष शैलाबेन मयूर,चेअरमन राजाभाई मयूर, उपाध्यक्ष विश्वनाथजी अग्रवाल, सचिव माधुरीताई मयूर, संचालक उर्मिलाबेन गुजराथी,चंद्रहासभाई गुजराथी, भूपेंद्रभाई गुजराथी, रमेशभाई जैन, तसेच मुख्याध्यापक पी एस गुजराथी, उपमुख्याध्यापक एस जी डोंगरे, उपप्राचार्य जे एस शेलार, समन्वयक गोविंदभाई गुजराथी,उल्हसभाई गुजराथी, डी टी महाजन,पर्यवेक्षक एस एस पाटील, पी डी पाटील, श्रीमती एम डब्ल्यू पाटील, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधूं भगिनींनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.