मुंबई-मराठा समाजाला आरक्षण हा सध्या महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा आहे. या मुद्द्यावर सरकारला विरोधक लक्ष करीत आहे. राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी तर ‘मराठा आरक्षणाच्या संदर्भातील फाईल माझ्याकडे असती तर मी क्षणाचाही विलंब न लावता आरक्षण दिले असते’, असे विधान केले. या विधानांचा आधार घेत शिवसेनेने मुख्यमंत्र्यांना उपरोधिक टोला लगावला आहे. कोणतेही अडथळे नसतील तर पंकजा मुंडे यांना एक तासासाठी पण सर्वानुमते मुख्यमंत्रीपद बहाल केले पाहिजे व तेवढी आरक्षणाची फाईल मोकळी केली पाहिजे. पंकजाताईंची भूमिका समजून घेतली पाहिजे.’ असा टोला शिवसेनेने सामना या वृत्तपत्राच्या अग्रलेखाच्या माध्यमातून लगावला आहे.
पंकजा मुंडे यांनी सांगितले आहे, नुसते सांगितले नाही तर शिवरायांची शपथ घेऊन सांगितले आहे की, ‘मराठा आरक्षणाच्या संदर्भातील फाईल माझ्याकडे असती तर मी क्षणाचाही विलंब न लावता आरक्षण दिले असते.’ याचा दुसरा अर्थ असा घेता येईल की, मराठा आरक्षणासंदर्भात फाईल मोकळी करायला सरकारात चालढकल केली जात आहे. मुख्यमंत्री फडणवीस या प्रश्नी एकाकी पडले आहेत काय? असा प्रश्न पडतो. जे पंकजा मुंडे यांना जमू शकते ते फडणवीस यांना का जमू नये? असाही प्रश्न आंदोलकांना आता पडला असेल. मराठा आरक्षणाचा निर्णय पंकजा मुंडे घेऊ शकतात व असे निर्णय घेण्यात