बीड: भाजप नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या ताब्यातील वैजनाथ साखर कारखान्यात जबरी चोरी झाली आहे. ३७ लाखांचे ऐवज चोरीला गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संगणक, यंत्र आणि इतर साहित्य चोरीला गेल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.