परभणी :- शेतकऱ्यांनी रिलायंस कंपनी आणि कृषी विभागकडून होत असलेल्या अन्यायाविरुद्ध आंदोलन सुरु केले आहे. हे आंदोलन शिवसेनेने परभणीत खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली सुरु केले आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यात रास्ता रोको सुरु आहे. या ठिकाणी टायर जाळून आंदोलन चिघळवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
पिक विमा, बोंड अळी व गारपीटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्यापही न मिळालेले अनुदान यासह शेतकऱ्यांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी परभणी जिल्ह्यात खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरु करण्यात आले आहे. यात शिवसैनिकांबरोबरच शहरात शेतक-यांनीही मोठ्या संख्येने भाग घेतला आहे. परभणी शहरात येणारे चारही रस्ते चक्काजाम आंदोलनामुळे बंद झाले आहेत. अनेक ठिकाणी वाहतुक खोळंबली आहे.