नवी दिल्ली-जीवनात परीक्षा सर्वस्व नाहीत. एक किंवा दोन परीक्षेत अपयशी ठरल्याने जीवन अपयशी ठरत नाही, असे सांगत स्वप्न, अपेक्षा असाव्यात मात्र त्यांचा तणाव नसावा. तंत्रज्ञानाचा उपयोग आपले सामर्थ्य वाढीसाठी करावा, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना दिला.
‘परीक्षा पे चर्चा २.०’ या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी देशभरातील विद्यार्थ्यांसह पालक आणि शिक्षकांशी संवाद साधला. यावेळी इतर देशातील विद्यार्थ्यांनीही या कार्यक्रमात भाग घेतला.
परीक्षेत नापास झाल्यास अनेक विद्यार्थी आत्म्हत्येसारखे पाऊल उचलतात. अपयशी झाल्यास विद्यार्थांनी हा मार्ग अवलंबू नये असा सल्ला मोदींनी दिला.