वादळी पावसाने हजेरीत ब्राह्मण संघाजवळ एका नव्याने उभारण्यात येत असलेले इमारतीचा भाग भिंत कोसळल्याने यातमात्र जिवीत हानी टळली

भुसावळ प्रतिनिधी l

शहरासह परिसरात आज दुपारी वादळी पावसाने हजेरी लावली असून यात ब्राह्मण संघाजवळ एका नव्याने उभारण्यात येत असलेले इमारतीचा भाग भिंत कोसळल्याने यातमात्र जिवीत हानी टळली. गेल्या अनेक दिवसापासून तीव्र आणि कडाक्याच्या उन्हामुळे त्रस्त झालेल्या भुसावळकरांना आज दुपारी आलेल्या पावसामुळे अल्पका होईना दिलासा मिळाला आहे. दुपारी बारा वाजेनंतर शहरात जोरदार जलधारा कोसळल्या यासोबत वादळी वारा असल्याने मात्र अनेक भागांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला. तर काही ठिकाणी पत्र उडाल्याची ही दिसून आले. दरम्यान वादळी वाऱ्यामुळे ब्राह्मण संघाजवळ रिदम हॉस्पिटलच्या बाजूला नव्याने उभारण्यात येत असलेल्या तीन मजली इमारतीची भिंत खाली कोसळली सुदैवाने याप्रसंगी खाली कुणीहीजा ये करत नसल्याने अनर्थ टळला.