भुसावळ l
जळगाव जिल्ह्यात झालेल्या वादळ व बेमोसमी पावसामुळे झाले निसवणीला व कटाईला आलेल्या केळी पिकाचे नुकसान झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या बाबत तात्काळ जिल्हा प्रशासन, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी व एग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लिमिटेड यांना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई निश्चित करण्याच्या सूचना ना.महाजन यांनी दिल्या आहेत.
शासन निर्णय नुसार 1 मार्च ते 31 जुलै 2023 या कालावधी ४० कि. मी. प्रति तास व त्यापेक्षा जास्त वाऱ्याच्या वेगाने केळी पिकाचे नुकसान झाले असल्यास तात्काळ विमा धारक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना ही त्यांनी दिल्या आहेत. तसेच ज्या शेतकऱ्यांचा विमा नसेल अशा शेतकऱ्यांना शासन निर्णयाप्रमाणे नुकसान भरपाईचा प्रस्ताव तात्काळ सादर करण्याबाबत प्रशासनास सांगितले ना गिरीश महाजन हे जिल्ह्यात असून जिल्हाधिकारी तसेच कृषी अधिकारी यांच्या संपर्कात असून शेतकऱ्यांना तात्काळ पंचानामे करुन शेतकऱ्यांना मदत करण्यचे आदेश दिले????