मुंबई| मुंबईतील बोरिवली स्टेशनवर धावती ट्रेन पकडणार्या तरुणाचा ट्रेनखाली येऊन मृत्यू झाला आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीतही कैद झाला. मूळचा अहमदाबादचा महेश आत्रा 3 जुलै रोजी गुजरात मेलने प्रवास करत होता. पिण्याच्या पाण्याची बाटली घेण्यासाठी तो बोरीवली रेल्वेस्थानकात उतरला, मात्र त्यानंतर लगेचच गाडी सुरू झाली, घाईगडबडीत गाडी पकडण्याच्या प्रयत्नात त्याचा तोल सुटला आणि महेश आत्रा गाडीबरोबर फरफटत केला.
पाण्याची बाटली घेण्यासाठी महेशने दुकानदाराला 100 रुपयांची नोट दिली होती, मात्र ट्रेन सुटल्याचे लक्षात येताच त्याने धावत ट्रेन पकडण्याचा प्रयत्न केला. एका हातात पाण्याची बाटली आणि दुसर्या हातात सुट्टे पैसे असल्याने त्याला ट्रेन पकडता आली नाही आणि त्याचा तोल गेला. ट्रेनखाली येण्यापूर्वी काही मीटर्सपर्यंत तो फरफटत ओढला गेला. यात त्याला गंभीर जखमा झाल्या ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. तातडीने रेल्वे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी या प्रवाशाचा मृतदेह बाहेर काढला. दरम्यान गेल्या काही दिवसात रेल्वेखाली येऊन होणार्या मृत्यूंचे प्रमाण वाढले आहे.
Web Title- passenger dies in running train