मुंबई : मुंबईत किरकोळ कारणातून झालेल्या हाणामारीत एका प्रवाशाला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तिघा अल्पवयीन तरुणांनी केलेल्या मारहाणीत टॅक्सी प्रवाशाचा मृत्यू झाला. मुंबईतील चेंबुर भागात टॅक्सी पकडताना हा प्रकार घडला. टॅक्सीतून उतरताना लवकर पैसे दिले नाहीत, म्हणून टॅक्सीत चढण्याची वाट बघणाऱ्या तिघांनी टॅक्सीत बसलेल्या प्रवाशाला मारहाण केली. सुरेंद्र सिंग असे मृत प्रवाशाचे नाव आहे. मारहाण करणारे तीन आरोपी अल्पवयीन असल्याची प्राथमिक माहिती आहे