हार्दिक पटेल यांचा विवाहसोहळा संपन्न !

0

अहमदाबाद – गुजरातचे पाटीदार आरक्षण आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल यांचा आज २७ जानेवारी विवाहसोहळा संपन्न झाला. हार्दिक पटेल यांनी त्यांची बालमैत्रीण किंजल पारीख हिच्याशी विवाह केला. गुजरातमधील सुरेंद्रनगर जिल्ह्यातील दिगसर गावातील एका मंदिरात हा विवाहसोहळा पार पडला.

हार्दिक यांच्या लग्नासाठी दोघांचेही कुटुंबीय आणि जवळचे मित्रमैत्रिणी अशा काही महत्त्वाच्या लोकांनाच निमंत्रण देण्यात आले होते. अहमदाबाद जिल्ह्यातील विरामगाम तालुक्यातील चंदननगरी परिसरात हार्दिक आणि किंजल हे अनेक वर्षे राहायचे. किंजल ही कॉमर्स शाखेची पदवीधर असून पुढचे शिक्षण घेत आहे.