मुंबई- मुंबईतील जोगेश्वरी येथील बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात रुग्णाच्या उजव्या डोळ्याला उदराने कुरतडल्याची घटना घडली आहे. ठाणे येथील रहिवाशी वर्षीय परविंदर गुप्ता (२७) याचे गेल्या महिन्यात अपघात झाला होता. रुग्णालयाच्या जनरल वार्डमध्ये असताना परविंदरच्या उजव्या डोळ्याला उंदराने कुरतडले. केवळ रुग्णालयाची बदनामी करण्यासाठी रुग्णाचे नातेवाईक हे आरोप करत असल्याचे रुग्णालय प्रशासन म्हणते आहे. डॉक्टरांच्या एका ग्रुपचा या बदनामी मगे हात असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले आहे.