मुंबई :- पेटीएम ब्रॅंड हा वन97 कम्युनिकेशन्स लिमिटेडच्या मालकीचा आहे. बहुविध स्रोत आणि बहुविध डेस्टीनेशन असलेल्या पेमेंट सोल्युशन प्रदाता पेटीएम ने आपल्या अॅप मध्ये ‘माय पेमेंट्स’ हे वैशिष्ट्य जोडून आपल्या ग्राहकांसाठी बँक ट्रान्सफर्सचे एकीकरण केले आहे. या फीचरमुळे पेटीएम चे वापरकर्ते नेहमी करावी लागणारी मोठ्या मुलयाची पेमेंट्स आणि इतर मासिक खर्च क्षणार्धात करू शकतील. पेटीएम अॅप वापरुन कोणत्याही एका बँक खात्यातून दुसर्या बँक खात्यात बँक ट्रान्सफर करता येऊ शकेल आणि ग्राहकांना 0% शुल्क देऊन पेमेंट करणे शक्य होईल. केवाईसी पूर्ण न केलेले पेटीएम वापरकर्ते देखील या सुविधेचा लाभ घेऊ शकतील.
आपल्या बहुभाषिक अॅपमध्ये ही सुविधा जोडताना कंपनीला हा विश्वास वाटतो की,त्यांच्या मंचावरून बँक ट्रान्सफरच्या व्यवहारात भरघोस वाढ होईल. या वर्षाच्या अंतापर्यंत मासिक बँक ट्रान्सफर्समध्ये ६०००० कोटी रु चे व्यवहार प्रोसेस करण्याचे पेटीएम चे लक्ष्य आहे. आपल्या वापरकर्त्यांना ही कंपनी आपली बँक खाती लिंक करण्यासाठी आणि घर भाडे, व्यापारातील पेमेंट्स, फी, वेतन आणि एकमेकांना करण्याची पेमेंट्स वगैरे नियमितपणे दरमहा करण्याची विविध प्रकारची पेमेंट्स तत्काळ आणि सुरक्षित बँक ट्रान्सफरमार्फत करण्यासाठी आग्रहपूर्वक शिकवण देत आहे. सर्व पेमेंट्स आणि बँक ट्रान्सफर गरजांसाठी ते आता एक स्थायी सोल्युशन बनले आहे. आपल्या कोर व्यवसायात ५००० कोटी रु गुंतवण्याची देखील कंपनीची योजना आहे आणि या वर्षात व्यवहारांची संख्या १ बिलियनहून वाढून २ बिलियन होण्याची आशा कंपनीला आहे.
पेटीएम चे वरिष्ठ उपाध्यक्ष दीपक अॅबट म्हणाले,“आमचे ग्राहक घर भाडे, मोलकरीण / ड्रायव्हरचा पगार, दूध आणि पेपरवल्याचे बिल यांसारखी पेमेंट्स दर महा ऑनलाइन करतात. याच्यामुळे आमच्या बँक ट्रान्सफर सेवेत खूप वाढ झाली आहे. ही पेमेंट्स सोपी करण्यासाठी आम्ही आता ‘माय पेमेंट्स’ दाखल केले आहे आणि कॅशलेस होण्याकडे बदलत चाललेल्या ग्राहकाच्या कलामुळे आम्ही यात सहा पट वृद्धी होण्याची अपेक्षा करतो आहोत. आमचे ग्राहक हे जाणतात की पेटीएम ही केवळ एक डिजिटल वॉलेट कंपनी नाही आणि दैनंदिन जीवनात पेटीएम वापरण्यातील सोयीस्करपणा वापरकर्त्यांना समजावून देताना आम्ही या अॅपमध्ये अशी आणखीन ग्राहक-केंद्री वैशिष्ट्ये जोडत राहू.”