महापालिकेने ओला कचरा स्वीकारावा

0

पिंपरी :- पिंपरी-चिंचवड महापालिकेने 1 एप्रिल 2018 पासून हौसिंग सोसायट्यांचा ओला कचरा स्वीकारणे बंद केले आहे. सोसायटीला ओला कचरा जिरविण्याची व्यवस्था करणे बंधनकारक करण्यात आले होते, परंतू अनेक सोसाट्यांनी कचरा जिरविण्याची व्यवस्था केली नसल्यामुळे सोसायट्यांचे ओला कचरा स्वीकारण्यात यावा, अशा सूचना भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी पालिका प्रशासनाला केल्या आहेत. तसेच कचरा न स्वीकारल्यामुळे तेथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यासाठी कचरा जिरविण्याची यंत्रणा पुर्णपणे सोसायट्या निर्माण करीत नाहीत तोपर्यंत पालिकेने ओला कचरा स्वीकारणे पुढे चालू ठेवावे, असेही ते म्हणाले.

शहरातील दररोज 100 किलो ओला कचरा निर्माण होणाऱ्या हौसिंग सोसायट्या व इतर आस्थापनाकडून 1 एप्रिलपासून तो कचरा स्वीकारला जात नव्हता. पालिकेने या संदर्भात संबंधित सोसायट्या व आस्थापनांनी खत निर्मिती प्रकल्पाची व्यवस्था करण्यासाठी 31 मार्चपर्यंत मुदत दिली होती. परंतु, अद्यापही अनेक सोसाट्यांनी ओला कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची व्यवस्था केली नाही.