पिंपरी :- पीसीएमटीचे माजी अध्यक्ष सुरेश ज्ञानोबा चौंधे (वय 53) यांचे आज (रविवार) अल्पशा आजाराने निधन झाले. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सुरेश चौंधे हे पिंपळेनिलख येथील भाजपच्या नगरसेविका आरती चौंधे यांचे ते पती होत.
गेल्या काही महिन्यापासून चौंधे आजारी होते. त्यांच्यावर एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान आज त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी आरती, दोन मुले संकेत व विनय असा परिवार आहे.