कल्याण प्रतिनिधी l कल्याण डोंबिवली महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त अतुल पाटील यांनी काल अचानक कल्याण शीळ रोडची पाहणी केली.
यावेळी उपमुख्य स्वच्छता अधिकारी ए. एल. घुटे, डोंबिवली विभागाचे उपमुख्य स्वच्छता अधिकारी वसंत देगलुरकर, जे प्रभागाच्या सहा. आयुक्त संविता हिले, आय प्रभागाच्या सहा. आयुक्त हेमा मुंबरकर,स्वच्छता अधिकारी संदिप खिस्मतराव मोहन दिघे, सुरेश सोळंके, राजेंद्र खैरे उपस्थित होते. पाहणी करताना रस्त्यालगत असलेल्या परिसरात काही ठिकाणी कचरा टाकल्याचे आढळून आल्याने या प्रभागक्षेत्रातील कार्यरत 2 सफाई कर्मचारी, 1 मुकादम, 1 स्वच्छता निरीक्षक व 2 स्वच्छता अधिकारी यांना याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. तसेच या ठिकाणी पडलेला कचरा त्वरीत उचलण्याबाबत घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त अतुल पाटील यांनी संबंधितांना सूचना दिल्या. तसेच या परिसरात उघड्यावर कचरा टाकणाऱ्या व्यापारी, नागरिकांविरुध्द दंडात्मक
कारवाई करण्यात आली असून एकूण ११ व्यापारी, नागरिक यांच्याकडून एकूण ८३०० रुपये इतका दंड वसूल करण्यात आला