नवी दिल्ली: राहुल गांधी यांचा अमेठीतून पराभव झाल्यानंतर मनेका गांधी यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. मनेका गांधी यांनी प्रसार माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, राजकारण हा काही पोरासोरांचा खेळ नसून, गाडीत बसून हात उंचावला म्हणजे निवडणूक प्रचार झाला असे होत नाही, अशी टीका मनेका गांधी यांनी राहुल गांधी यांच्यावर केली आहे.
राहुल गांधी यांनी आपल्या प्रचारात कुठलाही चांगला मुद्दा उपस्थित केला नाही, जर का राजकारण करायचे असेल व्यवस्थित आणि गंभीरपणे करायला शिका असा सल्लाहि त्यांनी राहुल यांना दिला आहे. उत्तरप्रदेशात कॉंग्रेसला चांगल्यापैकी जागा मिळतील असा विश्वास होता. पण स्वतः राहुल गांधी यांना अमेठी मधून पराभवाचा सामना करावा लागला.
मनेका गांधी ह्या सुलतानपूर मतदारसंघातून निवडून आल्या असून, त्यांनी बसपाचे उमेदवार चंद्रभद्र उर्फ सोनू सिंह यांचा १४ हजार मतांनी पराभव केला आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. आता मनेका गांधी यांच्या या वक्तव्यावर कॉंग्रेस काय प्रतीक्रिया देते हे पाहणे औस्तुक्याचे ठरेल.