धुळे: आपल्या जन आशीर्वाद यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे धुळ्यात आले होते. लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेनेला मतदान केल्याबद्दल जनतेचे आभार मानत आहे. येणाऱ्या विधानसभेला मतदान करण्याचे आवाहन आदित्य यांच्याकडून केले जात आहे. आज धुळ्याला आल्यानंतर ठाकरे यांनी आपण मुख्यमंत्री व्हायचे की नाही हे जनतेने ठरवायचे आहे असे सूचक विधान केले आहे.
धुळ्यात आज आल्यानंतर त्यांनी माध्यमांशी सवांद साधत, मुख्यमंत्री पदासंदर्भात शिवसेना आणि भाजपच संगळ ठरल आहे. तसेच आपण पद मिळविण्यासाठी जन आशीर्वाद यात्रा काढली नसल्याचे आदित्य यांनी स्पष्ट केले. दरम्यान शिवसेनेकडे मुख्यमंत्रीपद आल्यास आदित्य ठाकरेच मुख्यमंत्री असं खासदार संजय राऊत यांनी म्हटले होते. त्या दृष्टीने शिवसेनेकडून प्रयत्न सुरू आहेत.
येत्या विधानपरिषेदेला जर मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे आल्यास पदासाठी आदित्य ठाकरेच प्रबळ दावेदार आहेत असे सूचक विधान खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. आदित्य ठाकरे यांच्यात मुख्यमंत्री पदाचे सगळे नेतृत्व गुण असल्याचे म्हटले आहे.