मुंबई- केंद्र सरकारने इराणला मुंबईत बँक शाखा सुरु करण्यास परवानगी दिली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भारत दौऱ्यावर आलेले इराणचे विदेश मंत्री जवाद जरीफ यांच्यासोबत बैठक घेतली.
पुढील तीन महिन्यात इराणची बँक शाखा मुंबईत सुरु होणार आहे. यावेळी नितीन गडकरी यांनी विविध मुद्द्यावर चर्चा केली. भारताने चाबहार बंदरवरील मशीन खरेदीसाठी ८.५ कोटी डॉलरच्या ऑर्डरला मंजुरी दिली आहे.