परसाडे जिल्हा परिषद मराठी शाळेच्या उपशिक्षीका कल्पना माळी या शासनाच्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्काराने सन्मानित

यावल ( प्रतिनिधी ) सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या तालुक्यातील परसाडे या आदिवासी वस्तीच्या जिल्हा परिषद मराठी शाळेच्या उपशिक्षीका सौ कल्पना माळी यांचे त्यांनी केलेल्या नि:स्वार्थ भावनेने केलेल्या शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ठ कार्याबद्दल राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागाच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या राज्यस्तरीय शिक्षक पुरस्काराने मुंबई येथे एका कार्यक्रमात सन्मानित . यावल तालुक्यातील परसाडे या आदिवासी गावात ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या जिल्हा परिषद मराठी शाळेच्या उपशिक्षीका सौ कल्पना दैवीदास माळी यांचा राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागाच्या वतीने दिला जाणारा २o२३चा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे . मुंबई येथे दिनांक ५ सप्टेंबर रोजी टाटा नाटयगृहात शिक्षकदिना निमित्त संपन्न झालेल्या या भव्य पुरस्कार सोहळ्यास महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री ना . अजीत पवार ,शालेय शिक्षणमंत्री ना दिपक केसरकर,मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रसाद लोढा,राज्य शासना शालेय शिक्षण विभागाचे राज्य सचिव रणजीतसिंग देओल आदी मान्यवरांच्या उपस्थित सौ.कल्पना देविदास माळी यांचा सन्मानपत्र व एक लाख दहा हजार रुपये अशा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले . त्यांनी मिळवलेल्या या पुरस्काराचे परसाडे गावाच्या प्रथम नागरीक लोकनियुक्त सरपंच मिना राजु तडवी,उपसरपंच राजु तडवी, जिल्हा परिषदच्या माजी सदस्या सविता भालेराव,वड्री गावाचे सरपंच अजय भालेराव, उपसरपंच पंकज चौधरी ,ग्रामसेवक मजीत तडवी, परसाडे त्यांच्या शाळेचे मुख्याध्यापिका हसीना तडवी व त्यांचे सर्व शिक्षकांनी त्यांचे अभिनंदन केले.