पेट्रोल ९ पैशांनी कमी

0

मुंबई :- कर्नाटका विधानसभेचा निकाल जाहीर होताच सरकारने केलेल्या पेट्रोल-डिझेलच्या सलग १६ दिवसाच्या दरात घतघशीत वाढ केली होती. आज तेल कंपन्यांनी सलग चौथ्या दिवशी आपल्या ग्राहकांना दिलासा दिला आहे. आज मुंबईच्या बाजारात पेट्रोलचा 86.01 तर डिझेलचा दर 73.58 रुपये आहे. मुंबईत 9 पैशांनी पेट्रोल कमी झाले आहे. तर चेन्नईत चार दिवसात 23 पैसे दर कमी झाले आहेत. परंतु ज्या पद्धतीने इंधन दरामध्ये वाढ झाली आहे त्या प्रमाणे दर कमी होताना दिसत नाही. त्यामुळे सर्वसामान्यांना या गोष्टीचा फटका सहन करावा लागत आहे.

राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोल काल ७८.२९ होते ते आज ७८.२० आहे. तर कोलकातात ८०.८४, चंदिगढ ७५.२१ दर आहेत.