पेट्रोल ७ तर डिझेल ५ पैशांनी स्वस्त

0

मुंबई :- पेट्रोल-डिझेलच्या सलग १६ दिवस इंधनाच्या दरात घसघशीत वाढ झाल्यानंतर आज दुसऱ्या दिवशी पेट्रोल प्रति लिटर ७ पैसे तर डिझेल ५ पैशांनी स्वस्त झाले आहे. कर्नाटका विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होताच सलग १६ दिवस पेट्रोल-डिझेल दरांमध्ये होत गेली. या इंधन दरवाढीचा सर्वसामान्य जनतेला चागलेच चटके बसले आहे.

काल (बुधवारी) इंधन दर ६० पैशांनी कमी केल्याचे जाहीर केले. परंतु तेल कंपन्यांनी कोलांटउडी घेत इंधन दरात केवळ एक पैशांची कपात झाल्याचे सांगितले. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने म्हटले होते की, तांत्रिक चुकीमुळे हा घोळ झाला. याप्रकारामुळे देशभरात संतापाची लाट उसळली होती. दिल्लीमध्ये आज पेट्रोलचा दर ७८.३५ रूपये आणि डिझेल ६९.२५ रूपये असा आहे. तर मुंबईत पेट्रोलचा दर ८६.१६ रूपये तर डिझेल ७३.७३ रूपये असा दर असा दावा प्रधान यांनी केला होता.