नवी दिल्ली-गेल्या काही आठवड्यांमध्ये इंधन दरवाढीचा भडका उडाला होता. त्यामुळे जनतेमधून तीव्र संताप व्यक्त केला जात होता. त्यानंतर गेल्या ४ दिवसांपासून पेट्रोल डिझेलच्या दरात घट होत आहे. आता आणखी एकदा इंधन दरात घट झाली आहे. तेल कंपन्यांकडून पेट्रोलमध्ये ७ पैसे आणि डिझेलच्या दरामध्ये १० पैसे कपात करण्यात आली आहे. इंधन दरामध्ये कपात झाल्यानंतर दिल्लीमध्ये आता पेट्रोल ७६.१६ रुपये प्रति लिटर झाले आहे. तर, डिझेल ६७.६२ रुपये प्रति लिटरने मिळणार आहे.
दिल्लीत पेट्रोल ७६.१६ डिझेल ६७.६२, मुंबई पेट्रोल ८३.६१ डिझेल ७१.७९, कोलकाता पेट्रोल ७९.०५ डिझेल ७०.३७, चेन्नई पेट्रोल ७९.११ तर डिझेल ७१.४१ रुपये इतके आहे.