नवी दिल्ली-पेट्रोल आणि डिझेलचे दर पुन्हा एकदा विक्रमी स्तरावर जाण्याची मालिका पुन्हा सुरू झाल्याचे दिसते. आज सोमवारी सलग दुसऱ्या दिवशी डिझेलच्या दर वाढले. पेट्रोलच्या किंमतीतही वाढ होताना दिसत आहे. सोमवारी दिल्लीत एक लिटर डिझेलचे दर ६९.४६ रूपये झाला आहे. डिझेलचा हा विक्रमी दर आहे. कोलकातात डिझेल ७२.३१ आणि चेन्नईत ७३.३८ तर मुंबईत ७३.७४ रूपये प्रति लिटर दर झाला आहे.
दिल्लीत प्रति लिटर पेट्रोलमध्ये १३ पैशांची वाढ झाली. त्यामुळे तिथे पेट्रोलचे दर ७७.९१ रूपये प्रति लिटर दर होता. तर कोलकातामध्ये ८०.८४, मुंबईत ८५.३३ आणि चेन्नईत ८०.९४ रूपये प्रति लिटर असा दर आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होताना दिसत आहे. घसरत चाललेला रूपया आणि मजबूत होत असलेल्या डॉलरमुळे इंधनाच्या किंमती वाढत आहेत. मागील आठवड्यात कच्च्या तेलाच्या किमतीत तेजी दिसून आली. मागील आठवड्यात कच्च्या तेलाच्या दरात ५ टक्क्यांची वाढ झाली होती. कच्च्या तेलाशिवाय डॉलरच्या तुलनेत रूपयाची होत असलेली घसरणही इंधनाच्या दरवाढीस कारणीभूत आहे. सध्या रूपया ७० रूपयांच्यावर आहे.