पुणे :- पेट्रोल आणि डिझेलमधील दरवाढ कमी करण्याबाबत सरकार त्यावर नियोजन करीत आहे. राज्य सरकारने पुढाकार घेतला तर इंधनाचे दर कमी होऊ शकतात. पेट्रोल आणि डिझेल ला जीएसटी लागू केल्यास ७ ते ८ रुपयांनी कमी होतील. असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
महिन्याला किमान चार रुपयांची बचत होईल
यावेळी नितीन गडकरी म्हणाले की,पेट्रोल डिझेल चे दरवाढ झाल्याने त्याचा सर्वांवर परिणाम होत असला.तरी खाद्य पदार्थ चे दर कमी असून या सर्व गोष्टी लक्षात घेता.येत्या सहा महिन्यांच्या काळात इथोनॉल आणि इलेक्ट्रकवर चालणारी वाहने बाजारात येणार असल्याने प्रत्येक नागरिकाचे महिन्याला किमान चार रुपयांची बचत होईल. अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. दरम्यान गडकरी यांनी काँग्रेसवरही तोंडसुख घेतले. भाजपने घटनेत बदल केल्याची टीका काँग्रेसकडून वारंवार करण्यात येते, परंतु, काँग्रेसची सत्ता असताना 72 वेळा घटनेत बदल करण्यात आला असा आरोप गडकरी यांनी यावेळी काँग्रेसवर केला. 2014 मध्ये पेट्रोलचे दर कमी करण्याचा दावा करून मोदी सरकार सत्तेवर आले. त्यानंतर काही महिन्यांसाठी पेट्रोलचे दर 72 हून 62 रुपयांवर आले होते. परंतु, गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर पुन्हा वाढले आहेत.