सलग ९ व्या दिवशी पेट्रोल-डीझेलच्या दरात कपात

0

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत होणाऱ्या बदलांचा परिणाम भारतीय बाजारात पहायला मिळत आहे. गुरुवारी पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा एकदा घट झाल्याचे पहायला मिळाले. इंधन दर कपातीचा हा सलग ९वा दिवस आहे. इंधन दरात झालेल्या कपातीमुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

गुरुवारी पेट्रोलच्या दरात ९ पैशांनी आणि डिझेलच्या दरात ८ पैशांनी कपात झाली आहे. यानंतर देशातील चार महानगरांपैकी दिल्लीत पेट्रोलचा दर ७७.६३ रुपये प्रति लीटर, मुंबईत ८५.४५ रुपये प्रति लीटर झाला आहे. तर राजधानी दिल्लीत डिझेलचा दर ६८.७३ रुपये, मुंबईत ७३.१७ रुपये प्रति लीटर झाला आहे.