पुन्हा पेट्रोल, डिझेलचा भडका; जाणून घ्या आजचे दर

0

नवी दिल्ली – पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. यामुळे सामान्यांच्या खिशाला आणखी चटका बसणार आहे. या दरवाढीमुळे मालाच्या किंमतीमध्ये देखील वाढ होण्याची शक्यता आहे.

दिल्लीत पेट्रोलचे दर लीटरमागे १६ पैशांनी वाढले आहेत तर डिझेलचे लीटरमागे दर ३४ पैशांनी वधारले आहेत. त्याचबरोबर आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतही पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. पेट्रोल लीटरमागे १६ पैशांनी महागला असून, डिझेल ३६ पैशांनी वधारले आहे.

नव्या दरांनुसार राजधानीत पेट्रोलचे दर ७८.८४ रु. प्रति लीटर झाले असून, डिझेल ७०.७६ रु. प्रति लीटर झाले आहे. तर, मुंबईत पेट्रोलचे दर ८६.२५ रु. प्रति लीटर झाले असून, डिझेल ७५.१२ रु. प्रति लीटर या उंचीवर गेले आहेत.