मुंबई- पेट्रोल-डीझेलच्या वाढत्या किंमतीमुळे त्रस्त असलेल्या सामान्य जनतेला गेल्या गेल्या काही दिवसांपासून दिलासा मिळत आहे. आज सलग १२ व्या दिवशी पेट्रोल आणि डीझेलच्या दरात कपात करण्यात आली आहे. मुंबईत पेट्रोल ३० पैशांनी आणि डिझेल २१ पैशांनी स्वस्त झाले. त्यामुळे मुंबईत पेट्रोलचा दर ८५ रुपये २४ पैसे प्रति लिटर इतका आहे. तर डिझेलचा दर प्रति लिटर ७७ रुपये ४० पैसे इतका झाला आहे. दिल्लीतही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अशीच कपात झाली आहे. दिल्लीत पेट्रोलचा दर ७९ रुपये ७५ पैसे प्रति लिटर इतका झाला आहे. तर डिझेलचा दर ७३ रुपये ८५ पैसे प्रति लिटर इतका झाला आहे.