मुंबई :- पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये सलग चौदाव्या दिवशी वाढ झाली आहे. मुंबईमध्ये आज पेट्रोलच्या प्रतिलिटर दरामध्ये 15 पैसे तर डिझेलच्या प्रतिलिटर दरात 17 पैशांनी वाढ झालीय आहे. मुंबईत पेट्रोलचे दर 85 रुपये 96 पैशांवर पोहोचले आहेत. या इंधन दर वाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसत आहे. जर कच्या तेलाचे दर आणखी वाढवले तर इंधनचे दर १०० रुपयापर्यंत होण्याची शक्यता आहे.
राजधानी दिल्लीत पेट्रोलचे दर ७७.९७ वरून ७८.१२ प्रतीलिटर झाले आहे. कोलकाता ८०.७६, चेन्नई ८१.११, बेंगळूरू ७९.४० व चंदिगढ ७५.१३ प्रतीलिटर आहे. देशात सर्वात महाग पेट्रोल मुंबईमध्ये मिळत आहे. पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्याचे संकेत पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिले आहेत. तसेच मोदी सरकारला चार वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी इंधनदराबाबत लवकरच दीर्घकालीन उपाययोजना आखण्याचे आश्वासन दिले. मात्र, इंधन दरवाढीची कटकट कधी संपणार?, हा प्रश्न निरुत्तरितच आहे. दरम्यान, देशात सर्वात महाग पेट्रोल-डिझेल महाराष्ट्रात आहे.