पेट्रोल-डिझेल दरवाढीच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

0
नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखाली सरकारच्याविरोधात उदया मोर्चा…
मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने पेट्रोल आणि डिझेल दरवाढीच्याविरोधात पक्षाचे राज्यउपाध्यक्ष आणि राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखाली उदया ( बुधवारी ) दिनांक ३० मे रोजी मुंबईच्या अणुशक्तीनगरमध्ये भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे.
राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने पेट्रोल-डिझेलच्याविरोधात तीव्र आंदोलन केले जात असून उदया ३० मे रोजी सकाळी १० वाजता पांजरापोळ सर्कल येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयापासून मोर्चाला सुरुवात होणार आहे.