इंधन दरवाढीत सलग पंधराव्या दिवशीही वाढ

0

मुंबई – पेट्रोल-डिझेलच्या दरात सलग पंधराव्या दिवशीही वाढ झाली आहे. मुंबईमध्ये आज पेट्रोलच्या प्रतिलिटर दरात 12 पैशांनी वाढ झाली असून पेट्रोल प्रतिलिटर 86 रुपये 08 पैसे दराने तर डिझेलचे प्रतिलिटर 73 रुपये 64 पैशांना दराने मिळत आहे. सलग पंधराव्या दिवशी झालेल्या इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसत आहे.


 

पेट्रोल-डिझेल दरवाढीचा परिणाम जीवनावश्यक वस्तूंवरही झाल्यामुळे सर्वसामान्यांना महागाईचे चटके सहन करावे लागत आहे. राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचे आजचे दर ७८.२७, चेन्नईत ८१.२६, कोलकाता ८०.९१ दराने मिळत आहे.