पेट्रोल-डीझेलच्या दरात वाढ; असे आहेत आजचे दर

0

नवी दिल्ली : सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल-डीझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे. आज शुक्रवारी पेट्रोल ५ तर डिझेल ६ पैसे प्रति लीटरने महागले आहे. त्यामुळे मुंबईमध्ये पेट्रोलचे दर ७५.८७ रुपये आणि डिझेल ६७.११ रुपये आहेत. दिल्लीमध्ये एक लीटर पेट्रोलची किंमत ७०.१७ रुपये आणि डिझेलची किंमत ६७.११ रुपये इतकी आहे. कोलकातामध्ये पेट्रोल ७२.४३ रुपये आणि डिझेल ६५.७० रुपये तर नोएडामध्ये पेट्रोल ७०.१३ रुपये आणि डिझेल ६३.४७ रुपये प्रति लीटर आहे.

गुरुवारी पेट्रोल ७ तर डिझेल ५ पैशांनी महागले होते. दोन दिवस किंमत स्थिर राहील्यानंतर सलग दोन दिवस किंमतीत वाढ होत आहे. १६ जूनला पेट्रोल आणि २० जूनला डिझेल स्वस्त झाले होते. त्यानंतर किंमती सतत वाढत गेल्या किंवा स्थिर नाहीत.