महाराष्ट्रात पेट्रोलच्या किंमतीत ५ रुपयाची कपात

0

मुंबई : इंधनाच्या दरामध्ये केंद्र सरकराने अडीच रुपये कमी केल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकरानेही केवळ पेट्रोलमध्ये अडीच रुपयांची कपात करण्याचे ठरविले आहे. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावर शिक्कामोर्तब केले. तर डिझेलचे भाव आहे तसेच राहणार आहेत.

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी नुकतीच अडीच रुपयांनी इंधनाचे दर कमी करण्याची घोषणा केली होती. तसेच राज्य सरकारांनाही आणखी अडीच रुपयांनी पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्याचे आवाहन केले होते. यानुसार महाराष्ट्र सरकारने लगेचच अडीच रुपयांनी पेट्रोलचे दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. आज मुंबईमध्ये पेट्रोल 91.34 रुपये तर डिझेल 80.10 रुपयांना विकले जात आहे. नवे दर मध्यरात्रीपासून लागू होणार असून नव्या दराप्रमाणे पेट्रोल 86.34 आणि डिझेलचा दर 77.60 रुपयांना मिळेल.