देशभरात ६ वाजेपर्यंत ५९.७० टक्के मतदान !

0

नवी दिल्ली: आज देशभरात लोकसभेच्या सहाव्या टप्प्यातील मतदान होत आहे. सात राज्यातील ५९ जागांसाठी आज मतदान होत आहे. सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. मतदानाला शेवटचे एक तास शिल्लक असतांना सायंकाळी ६ वाजेपर्यंत देशभरात ५९.७० टक्के मतदान झाले होते.

पश्चिम बंगालमध्ये ८०.१३, दिल्ली ५५.४४, हरयाणा ६२.१४, उत्तर प्रदेश ५०.८२, बिहार ५५.०४, झारखंड ६४.४६, मध्य प्रदेश ६०.१२ टक्के मतदान झाले आहे. सायंकाळी ६ वाजेपर्यंत झालेल्या मतदानात पश्चिम बंगाल आघाडीवर आहे.