PHOTO: बघा, पुण्यातील भयावह पूरपरिस्थिती !

0

पुणे: काल बुधवारी रात्री पुण्यात पावसाने अक्षरश: कहर केला आहे. ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने ११ जणांचा मृत्यू झाला आहे. पुण्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान पुण्यातील १४ हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले आहे. बारामती परिसरात नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. शाळा, महाविद्यालये, शासकीय, खाजगी कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

रात्री झालेल्या पावसामुळे पुण्यातील नागरिकांमध्ये भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे. वाहतूक व्यवस्था पूर्णपणे ठप्प झाली आहे. दरम्यान प्रशासनाकडून परिस्थिती हाताळण्यात येत आहे.

पुण्यातील पूरस्थितीचे छायाचित्र