गांधीनगर- सूरतहून काल संध्याकाळी सहलीहून परतताना महाराष्ट्राच्या सीमेला लागून असलेल्या डांग जिल्ह्यातील बर्डीपाडा गावाजवळच्या दरीत बस कोसळल्याने झालेल्या भीषण अपघातात १० विद्यार्थी जागीच ठार झाले आहे. तर ५० हून अधिक विद्यार्थी जखमी झाले आहे.
बसमध्ये पहिलीपासून आठवी पर्यंतचे जवळपास ६७ विद्यार्थी होते. शबरीधाम, पंपा सरोवर आणि महाल कॅम्प पाहिल्यानंतर घरी परतत असताना हा अपघात झाला आहे. अमरोली गावातील खासगी शिकवणी क्लासेसची ही बस होती. सर्व विद्यार्थी अमरेली येथील रहिवासी आहेत असं समजतंय. संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती आहे. घटनास्थळी बचाव पथकाने स्थानिकांसोबत मिळून विद्यार्थ्यांना दरीतून बाहेर काढले आणि रुग्णालयात दाखल केले आहे.