पुणे – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विधी, महिला व बालकल्याण, शहर सुधारणा आणि क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक या चार विषय समितीची सभापतीपदाची निवड बिनविरोध झाली आहे. विधी समितीसाठी माधुरी कुलकर्णी, महिला व बाल कल्याण समितीसाठी स्वीनल म्हेत्रे, शहर सुधारणा समितीसाठी सीमा चौगुले तसेच क्रीडा समितीसाठी संजय नेवाळे यांचे सत्ताधारी भाजपकडून एकमेव अर्ज दाखल झाल्याने ही निवड बिनविरोध झाली. महापालिकेच्या या सर्व सभापती पदांची निवडणूक आज पार पडली आहे.
यावेळी समाज कल्याण आयुक्त मिलिंद शंभरकर यांनी पीठासन अधिकारी म्हणून कामकाज पाहिले. निवड झाल्यानंतर सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी सर्व सभापतींचे अभिनंदन केले.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विधी समिती, महिला व बाल कल्याण समिती, क्रीडा-कला-साहित्य व सांस्कृतिक समिती, आणि शहर सुधारणा समितीमध्ये नवीन नगरसेवकांची २० एप्रिलच्या महासभेत निवड करण्यात आली. महापालिकेतील पक्षीय बलाबलानुसार सत्ताधारी भाजपचे पाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन आणि शिवसेनेचा एक, अशी सदस्यांची विषय समितीत निवड करण्यात आली आहे.
विधी समिती
माधुरी कुलकर्णी, मनीषा पवार, उषा ढोरे, राजेंद्र लांडगे, वसंत बोराटे (भाजप), सुमन पवळे, संगिता ताम्हाणे, निकिता कदम (राष्ट्रवादी काँग्रेस), सचिन भोसले (शिवसेना)
महिला व बाल कल्याण समिती
हिराबाई घुले, आरती चोंधे, उषा मुढे, निर्मला कुटे, स्वीनल म्हेत्रे (भाजप), मंगला कदम, स्वाती काटे, वैशाली काळभोर (राष्ट्रवादी काँग्रेस), मीनल यादव (शिवसेना)
क्रीडा-कला-साहित्य व सांस्कृतिक समिती
अंबरनाथ कांबळे, शैलेश मोरे, सुजाता पालांडे, संजय नेवाळे, अश्विनी बोबडे (भाजप), अनुराधा गोफने, अपर्णा डोके, संजय वाबळे (राष्ट्रवादी काँग्रेस), अश्विनी वाघमारे (शिवसेना)
शहर सुधारणा समिती
सीमा चौघुले, माया बारणे, सुरेश भोईर, कमल घोलप, निर्मला गायकवाड (भाजप), वैशाली घोडेकर, सुलक्षणा धर, उषा वाघेरे (राष्ट्रवादी काँग्रेस), निलेश बारणे (शिवसेना)