Pimpri-Chinchwad : ऑक्टोंबरमध्ये होणार महापालिका निवडणुका?

पुणे : कोरोना काळापासून रखडलेल्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ऑक्टोंबर मध्ये होतील असे संकेत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. तसेच पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने जोरदार कामाला लागावे, अशा सुचना देखील त्यांनी दिल्या आहेत.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, महापालिका निवडणुका घेण्यासाठी आता पुरेसा वेळ नाही. पावसाळ्यात निवडणुका घेणे शक्य नाही. त्यामुळे ऑक्टोंबरमध्ये निवडणुका होतील. निवडणुकांमध्ये शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या उमेदवारांची अनामत रक्कम जप्त होईल, अशा पद्धतीने निवडणुकीची तयारी करायची आहे.

त्यासाठी प्रत्येक घरापर्यंत पक्षाच्या पदाधिकारी व कारकर्त्यांनी पोहचले पाहिजे. महापालिका निवडणुकीसाठी अनेक जण इच्छुक आहेत. मात्र, त्यासाठी पक्षाचे सरल ऍप घरोघरी पोहचले पाहिजे. किती जणांनी किती जणांपर्यंत ऍप पोहचवले आहे याची पाहणी मी स्वत: करणार आहे. त्यावरून महापालिकेत कोणाला तिकीट द्यायचे याचा निर्णय मी घेणार आहे. पक्षाचे सरल ऍप किमान ६० हजार कुटुंबांपर्यंत पोहचून ते डाऊनलोड करून घेणे आवश्यक आहे. शहरातील पक्षाच्या दोन्ही आमदारांनी हे टार्गोट पूर्ण करणे आवश्यक आहे, असंही बावनकुळे म्हणाले.