नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रधान सचिवपदी पीके सिन्हा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी आज पदभार स्वीकारले आहे. पंतप्रधानांचे प्रधान सचिव पद हे मोठे पद असून त्यावर दीर्घ अभ्यास असलेल्या व्यक्तीची निवड केली जाते. पीके सिन्हा यांनी आजपर्यंत विविध क्षेत्रात काम केले असून त्यांच्या कार्याचा लाभ पंतप्रधान आणि त्यांच्या कार्यालयाला होणार आहे.