भुसावळ प्रतिनिधी l
शहरालगत तापी नदीच पाणी वाहतय तसेच हातनुर धरणात समाधानकारक पाणी परंतु पाणीपुरवठा अभियंता चे निष्काळजीपणा भुसावल करांना सोसावे लागत आहे आज दि 17 रोजी खलवाडीत मध्ये पाणी सोडण्यात आले परंतु फक्त 10 मिनिटे सोडण्यात आले याबाबत पाणीपुरवठा अधिकारी यांना घ्यावी संपर्क साधला असता मोबाईल बंद दखवण्यात
आले कोणत्याही कर्मचाऱ्याशी संपर्क झाला नाही त्यात पाणी आले कि विद्युत पुरवठा बंद अशा या नगरपालिकेच्या भोंगळ करराला नागरिक वैतागले आहे तसेच एप्रिल महिन्याच्या प्रारंभापासून
शहराचा विविध कारणांनी पाणीपुरवठा विस्कळीत झाल्यानंतर अर्धा मे महिना संपल्यानंतरही तो सुरळीत करण्यात यंत्रणेला यश आलेले नाही. शहरातील सर्वच भागात 10 ते 12 दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने रणरणत्या उन्हात जनतेची पाण्यासाठी भटकंती येत आहे. शहराला लागून असलेल्या मात्र नगरपालिकेत समाविष्ट नसलेल्या आरएमएस कॉलनी भागात तर पाण्याची बेपर्वाईने नासाडी होत असताना दुसरीकडे याच भागातील काही भाग पाण्यासाठी आसूसला आहे. नागरीकांना दररोज पाण्याचे टँकर मागवण्याची वेळ आली आहे. पालिका प्रशासनाने या भागातील पाण्याची नासाडी थांबवून नागरीकांना दिलासा द्यावा, अशी माफक अपेक्षा व्यक्त होत आहे. गत महिन्यातच या भागात आमदार संजय सावकारे यांनी भेट देवून रहिवाशांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यावेळी या भागात मुबलक पाणीपुरवठा करण्यात आला मात्र त्यानंतर अद्यापही सुरळीत पाणीपुरवठा झाला नसल्याचे रहिवाशांनी सांगितले.
गडकरी नगरासाठी शहरात अंथरण्यात आलेल्या अमृत योजनेतील पाईप लाईन वापरात घेण्यात आली मात्रव् बसस्थानक भागासह फालक नगरात गळती लागल्याने योजनेच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले. आता पालिका प्रशासन मंगळवारी वा बुधवारी रेल्वे अधिकाऱ्यांसोबत बसस्थानक भागाचा सर्वे करणार असून त्यानंतर लिकेज दुरुस्ती केली जाईल, असे पाणीपुरवठा अभियंता देशमुख म्हणाले
शहराला लागून तापी नदी वाहते मात्र असे असतानाही महिन्यातून केवळ दोन वेळा पाणीपुरवठा होत असल्याने नागरीकांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे. अनेक भागात पंधरा दिवस उलटूनही पाणी येत नसल्याने नागरीक वर्गणी करून महागडा पाण्याच टँकर मागवत आहे. अमृत योजना असलीतरी प्रत्यक्षात ती कार्यान्वीत कधी होणार? याचे उत्तर सध्यातरी कुणाकडेच नाही.
मुखय अधिकारी यांचे पाणीप्रश्नावर नियोजन काय असा जनतेला प्रश्न पडला आहे
विविध कारणांमुळे गेल्या काही दिवसात पाणीपुरवठा विस्कळीत झाला मात्र आता लवकरच शहराचा पाणीपुरवठा पूर्वपदावर येणार असल्याचे पाणीपुरवठा अभियंता सतीश देशमुख यांनी सांगितले.