रस्त्याच्या दुभाजकामध्ये फुलझाडे लावा न.पा.मुख्याधिकार्‍यांना निवेदन

भुसावळ ः शहरातील प्रमुख रस्त्याचे कामे सुरु असून रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या दुभाजकात सुंदर अशी फुल झाडे लावल्यास भुसावळ शहराचा सौदयात भर पडण्यास मदत होईल, असे निवेदन समाजसेवक पराग भोळे यांनी भुसावळ न.पा. मुख्याधिकार्यांना दिले आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, भुसावळ शहरातील प्रमुख रस्ते जामनेर रोड, यावल रोड, जळगावकडे जाणार्या रस्त्यावर नगरपालिकेने दुभाजकाची निर्मिती केली आहे. या दुभाजकांवर सुंदर असे सुविचार व सामाजिक संदेश लिहून प्रबोधनाचे काम केले आहे. या कामावर न.पा.चा मोठा निधी खर्च झाला आहे. तरी या दुभाजकांमध्ये मातीचा भराव करून सुंदर अशी सुशोभित फुले लावावीत जेणेकरून शहराच्या सौदर्यात भर पडेल.

शहरातील ओपन स्पेसमध्ये वृक्षारोपण करा

भुसावळातील विविध ओपन स्पेसमध्ये घाणीचे साम्राज्य असून त्या जागा सुशोभित करुन त्याठिकाणी वृक्षारोपण करावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते पराग भोळे यांनी नगरपालिकेचे मुख्याधिकार्यांकडे केली आहे.