यावल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाने दत्तक घेतलेल चितोडा गावात मेरी माटी मेरा देश या उपक्रमाव्दारे वृक्षरोपण

यावल (प्रतिनिधी)- येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने भारताच्या अमृत महोत्सव निमित्त मेरी माटी मेरा देश उपक्रम अंतर्गत तसेच ‘जागतिक आदिवासी दिन’ व ‘क्रांती दिन’ निमित्त वृक्षारोपण संपन्न झाले.
वृक्षारोपण राष्ट्रीय सेवा योजनेचे चे दत्तक गाव चितोडा तालुका यावल येथे महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे, उप प्राचार्य प्रा.ए.पी. पाटील, प्रा.एम.डी.खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आले.
वृक्ष लागवड कार्यक्रम दत्तक गाव चितोडाचे सरपंच अरुण पाटील, पोलीस पाटील पंकज वारके, जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती कुंदा गाजरे, उपशिक्षिका सौ अर्चना कोल्हे व गावातील प्रतिष्ठित ग्रामस्थ यांच्या उपस्थित करण्यात आला.
यात वड, पिंपळ, औदुंबर, चिंच, निंब, सिसम, बकाम आदी वृक्षांची लागवड करण्यात आली. ही लागवड जिल्हा परिषद शाळा, गावठाण परिसर, स्मशानभूमी आदी ठिकाणी करण्यात आली. यावेळी चितोडा गावाचे प्रथम नागरिक सरपंच अरुण पाटील यांनी वृक्षांचे संगोपन व जतन केल्याने वातावरणातील तापमानात घट होऊन मातीची धूप थांबते तसेच पाऊस मानावर त्याचा परिणाम होतो, त्यामुळे प्रत्येक सुज्ञ व पर्यावरण प्रेमी नागरीकाने आपल्या शहरात,गावात व परिसरात वृक्षारोपण करण्याची साठीची जनजागृती सर्व स्वयंसेवकांनी करावी असे आवाहन सरपंचपाटील यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाचे आयोजन कार्यक्रम अधिकारी डॉ. आर. डी. पवार, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ. एच.जी.भंगाळे, महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. सौ.पी. व्ही. रावते, प्रा. नरेंद्र पाटील, प्रा. एन.डी. बोदडे, प्रा. पी. व्ही. सपकाळे, तेजश्री कोलते, संध्या कोळी, ख़ुशी धांडे, दिपक नलावडे,वेदांत माळी आदींनी सहकार्य केले.