खडसे महाविद्यालयातील एनएसएस विभागाकडून मुक्ताई मंदिर परिसरात प्लास्टिक फ्री अभियान

मुक्ताईनगर प्रतिनिधी…..

. खडसे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा विभागाद्वारे पर्यावरण दिन मुक्ताई मंदिर, जुनी कोथळी येथे संपन्न करण्यात आला. पर्यावरण दिनानिमित्त मुक्ताई मंदिर परिसरातील प्लास्टिकचा कचरा एनएसएस स्वयंसेवकांनी सुमारे चार पोती गोळा करून मुक्ताईनगर नगरपालिकेच्या घंटागाडीला देण्यात आला. मुक्ताई मंदिर परिसरात वारकरी आणि पर्यटकांनी कोणत्याही प्रकारची प्लास्टिक वस्तू वापरू नये व मंदिर परिसर स्वच्छ, निर्मल आणि निसर्गमय राखण्यासाठी आपण प्रत्येकाने प्लास्टिक वस्तू वापरणार नाही अशी शपथ घेऊन मंदिर परिसरातील निसर्गाचे संवर्धन व संधारण करणे काळाची गरज आहे असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य हेमंत महाजन यांनी केले. या निमित्ताने पर्यटकांना-वारकऱ्यांना प्लास्टिक फ्री अभियानाचा संदेश देण्यात आला. या अभियानाचे संपूर्ण संयोजन महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.अनिल पाटील यांनी केले, तर अभियानाचे समन्वयक म्हणून राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक विजय डांगे यांनी तर सहसमन्वयक म्हणून सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ. दीपक बावस्कर व डॉ. ताहीरा मीर यांनी कार्य केले. या अभियानात प्रफुल यमनेरे, मंगेश बराटे, कुणाल भारंबे, तेजस सरोदे, किरण माळी, योगेश बकाले, ज्ञानेश्वर शेळके, शितल भोई, सपना वंजारी,भाग्यश्री भोळे, रूपाली पाटील, प्रयुक्ता माळी व निकिता राठोड व इतर अनेक एनएसएस स्वयंसेवकांनी सक्रिय सहभाग घेऊन मुक्ताई मंदिर परिसरात प्लास्टिक फ्री अभियान यशस्वी केले.