अभियांत्रिकी प्रवेशासोबत प्लास्टिक मुक्तीचा संदेश

0
भुसावळ- हिंदी सेवा मंडळ संचालित श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे सन 2018-2019 या शैक्षणिक वर्षात अभियांत्रिकी शाखेच्या प्रवेशाकरीता माहिती व मार्गदर्शन समुपदेशन केंद्र डी.एस. हायस्कूल कॉम्प्लेक्स, गांधी पुतळ्याजवळ आणि सुरवाडे बूट हाउसजवळ, जामनेर रोड, येथे सुरू करण्यात आले असल्याची माहीती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी.सिंह यांनी दिली.
सन 2018-19 या शैक्षणिक वर्षाकरीता अभियांत्रिकी क्षेत्रातल्या विविध संधि, प्लेसमेंटच्या दृष्टीने शाखा निवड, शाखेत प्रवेश घेण्यासाठी लागणार्‍या आवश्यक निकष, शैक्षणिक कागदपत्रे आणि फी संबंधी माहिती सांगितली जात आहे. केंद्राला भेट देणार्‍या विद्यार्थी व पालकांना प्लास्टिक मुक्तीचा संदेश देत महाविद्यालयाच्या माहिती पुस्तकेसोबत कापडी पिशव्यांचे वितरण हिंदी सेवा मंडळ अध्यक्ष जे.टी.अग्रवाल, सचिव मधुलता शर्मा, प्राचार्य डॉ. आर.पी.सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली, डॉ.पंकज भंगाळे, प्रा.गिरीष भोळे, प्रा.सचिन हरिमकर, प्रा.प्रफुल्ल वानखेडे, प्रा.अनंत कूटे, प्रा.धीरज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.