तुरुंगात आणि जामीनावर असणाऱ्यांना मजबूत सरकार नको आहे: मोदी

0

पटना: लोकसभा निवडणुकीसाठी चौथ्या टप्प्यातील मतदान झाले आता. पाचव्या टप्प्यातील मतदानासाठी राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बिहारमधील मुजफ्फरपूर येथे प्रचारसभा घेत आहे. या प्रचारसभेत बोलतांना मोदींनी विरोधकांना लक्ष केले. जे तुरुंगात आहेत, जे जामिनावर आहेत, ते कोर्टाचे दरवाजे ठोठावत आहे. त्यांना मजबूत सरकार नको आहे अशी टीका मोदींनी केली. तुरुंगात असणारे, आणि जामिनावर असणारे एकत्र झाले असून मजबूत सरकारला हरविण्याचा प्रयत्न करत आहे अशीही टीका मोदींनी यावेळी केली.

चार टप्प्यातील मतदान झाले असून यातच विरोधक चारही कोणा चीत झाले आहे असा दावा करत मोदींनी उर्वरित निवडणुकीत फक्त विरोधकांची किती मोठ्या फरकाने पराभव होतो हे निश्चित होण्याचे राहिले असल्याचे सांगितले. एनडीएचा विजय किती मोठा होणार हे राहिलेल्या टप्प्यातील मतदानावरून स्पष्ट होईल असा दावा मोदींनी केला आहे.