अटलजींना कधीच सत्तेचा मोह नव्हता-मोदी

0

नवी दिल्ली-माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शंभर रुपयाचे नाणे जाहीर केले आहे. यावेळी बोलतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एखाद्या नेता सत्तेतून बाहेर पडल्यानंतर त्याला अस्वस्थ वाटू लागते. सत्ता गेल्यानंतर २-५ वर्ष नेते जनतेशी नाते तोडून दूर जातात. मात्र अटल बिहारी वाजपेयी यांना कधीही सत्तेचा मोह नव्हता. त्यांनी नेहमीच सत्ताधाऱ्यांना विरोध केला व लोकांसाठी आपला आवाज बुलंद ठेवला असे प्रतिपादन केले.

अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिनी १०० रुपयाच्या नाण्याचे अनावरण मोदींनी केले. या नाण्यावर भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचे छायाचित्र आहे. नाण्याचे वजन ३५ ग्रॅम आहे. नाण्याच्या अग्रभागी ‘सत्यमेव जयते’ लिहिले आहे.

उद्या २५ डिसेंबर रोजी अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती आहे. संपूर्ण देशात सुशासन दिन म्हणून साजरा केला जातो.