‘एक देश एक निवडणूक’: मोदींची सर्वपक्षीय नेत्यांसोबत बैठक; शरद पवार राहणार हजर

0

नवी दिल्ली: एक देश एक निवडणूकवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलविली आहे. मात्र या बैठकीपासून अनेक विरोधी पक्ष नेत्यांनी उपस्थित राहणार नसल्याचे जाहीर केले आहे. दरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार या बैठकीला उपस्थित राहणार आहे. दुसरीकडे शिवसेनेचा वर्धापनदिन कार्यक्रम असल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बैठकीला उपस्थित राहणार नाहीत हे स्पष्ट आहे.

पश्चिम बंगालच्या राजकारणावरुन ममता बॅनर्जी यांनी सत्ताधारी भाजपापासून लांब राहण्याचं धोरण अंवलंबलेले आहे. त्यामुळे आज होणाऱ्या बैठकीला ममता बॅनर्जी उपस्थित राहणार नाहीत. ममता यांच्यासोबतच परदेश दौऱ्यावर असणारे चंद्राबाबू नायडूदेखील सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित राहणार नसल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचा वर्धापनदिन कार्यक्रम असल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बैठकीला उपस्थित राहणार नाहीत हे स्पष्ट आहे. आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनीही बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचं सांगितले आहे तर आपकडून बैठकीला प्रतिनिधी पाठवला जाईल असं केजरीवाल यांनी स्पष्ट केले आहे.

मोदींच्या सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित राहायचे की नाही यावर चर्चा करण्यासाठी काँग्रेस नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीला उपस्थित राहावं की नाही यावर निर्णय होणार आहे. त्यामुळे सध्यातरी काँग्रेसच्या उपस्थितीबाबत सस्पेन्स आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार या बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.