कॉग्रेसच्या गुलाम नबी आझादांबद्दल बोलतांना मोदींना अश्रू अनावर

0

नवी दिल्लीः कॉग्रेसचे राज्यसभा खासदार माजी मंत्री आणि गांधी कुटुंबीयांचे अगदी निकटचे मानले जाणारे गुलाम नबी आझाद यांचा राज्यसभेतील कार्यकाळ संपुष्टात आला आहे. सध्या सुरु असलेले अर्थसंकल्पीय अधिवेशन आझाद यांचे शेवटचे अधिवेशन होते. दरम्यान त्यांच्या निरोपाच्या भाषणावर बोलतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी चांगलेच भावूक झाले.

गुलाम नबी आझाद यांच्या सोबत असलेल्या आपल्या मैत्रीचा उल्लेख करतांना मोदींना अश्रू अनावर झाले.

काश्मिरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आझाद यांनी केलेल्या सहाकार्याबद्दल सांगतांना मोदी भावूक झाले.

काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख केला, ज्यात गुजरात मधील लोकांचा मृत्यू झाला होता. त्या हल्ल्यानंतर सर्वात आधी माझ्याकडे गुलाम नबी आझाद यांचा फोन आला होता. फोनवर त्यांना अश्रू अनावर झाले होते. त्यावेळेस प्रणब मुखर्जीजी संरक्षण मंत्री होते. मी त्यांना विनंती केली की, मृतदेह आणण्यासाठी विमानाची गरज आहे. ते म्हणाले की, मी व्यवस्था करतो. त्यानंतर रात्री परत एकदा आझाद जी यांचा फोन आला होता आणि कुटुंबातील व्यक्ती प्रमाणे चिंता करत होते.’