नवी दिल्ली :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळात चार मोठे बदल केले. सोमवारी रात्री उशिरापर्यंत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे अर्थ मंत्रालयाचा अतिरिक्त कारभार देण्यात आले आहे. अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर सोमवारी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाले असल्यामुळे जितपर्यंत त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होतनही तितपर्यंत या खात्याचा कार्यभार गोयल यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
हे देखील वाचा
तसेच स्मृती इराणी यांच्याकडील माहिती व प्रसारण खाते काढून घेण्यात आले असून ते राज्यवर्धनसिंह राठौर यांच्याकडे देण्यात आले. एस.एस. अहलुवालिया यांच्याकडील पेयजल व स्वच्छता मंत्रालय काढून त्यांना इलेक्ट्रोनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे राज्यमंत्रिपद सोपवण्यात आले, तर राज्यमंत्री अल्फाॅन्स कन्नाथनम यांच्याकडील इलेक्ट्रोनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे काम काढून घेण्यात आले.